जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२५ । नाशिककरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. नाशिक विमानतळावरून सूरू असलेल्या विमानसेवांच्या वेळेत ३० मार्चपासून लागू होत असलेल्या ‘समर शेड्यूल’नुसार बदल करण्यात येत आहे.
तर नाशिक-नागपूर ही विमानसेवा बंद ठेवण्यात आली आहे. यामागील कारणही समोर आले आहे. नागपूर विमानतळ येथे कामे सुरू असल्याने तूर्तास ही सेवा बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान, कोलकात्याकरिता नवीन आणि दिल्लीकरिता दुसरे विमान सुरू होण्याची अपेक्षा होती त्याचा मात्र समर शेड्यूल्डमध्ये उल्लेख नाही. तसेच कुंभमेळ्याच्या पार्श्वभुमीवर इतर शहरांकरिताही सेवा सुरू होण्यासाठी केंद्रीय विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना निवेदन दिले आहे.
विमानसेवेच्या नव्या वेळा अशा
दिल्ली – नाशिक : टेकऑफ- स. ७.३०…… लॅण्डींग ९.२५
नाशिक – दिल्ली : टेकऑफ- स. ९.५५….. लॅण्डींग ११.५५
सेवेचे वार – सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरूवार, शुक्रवार, शनिवार, रविवार
अहमदाबाद – नाशिक : टेकऑफ- स. १०.४५ ….. लॅण्डींग -दु. १२.००
नाशिक – अहमदाबाद : टेकऑफ- दु. ३.०५ ….. लॅण्डींग -दु. ४.५०
सेवेचे वार – सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरूवार, शुक्रवार, शनिवार, रविवार
नाशिक – हैद्राबाद : टेकऑफ- दु. १२.५५….. लॅण्डींग -२.१५
हैद्राबाद – नाशिक : टेकऑफ-दु. ३.०५ ….. लॅण्डींग- ४.५०
सेवेचे वार – सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरूवार, शुक्रवार, शनिवार, रविवार
गोवा – नाशिक : टेकऑफ- दु. १२.५५ ….. लॅण्डींग – ३.५०
नाशिक गोवा : टेकऑफ- दु. ३.५० ….. लॅण्डींग – ५.५०
सेवेचे वार – सोमवार, बुधवार, शुक्रवार, रविवार
इंदुर – नाशिक : टेकऑफ- दु. २.४५….. लॅण्डींग – ३.५५
नाशिक – इंदुर : टेकऑफ- दु. ४.१५ ….. लॅण्डींग -५.२५
सेवेचे वार –मंगळवार, गुरूवार, शनिवार
बंगळूरू – नाशिक : टेकऑफ- दु. २.३०….. लॅण्डींग -४.१५
सेवेचे वार – सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरूवार, शुक्रवार, शनिवार, रविवार