नाशिक लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२५ । महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी एक बातमी समोर आलीय. ती म्हणजे राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि भाऊ सुनील कोकाटे (Sunil Kokate) यांना नाशिक (Nashik Court) जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
कोकाटे यांच्यावर 1995 साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप होते.माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता नाशिक जिल्हा न्यायालया माणिकराव कोकाटे यांच्याविरुद्ध निकाल दिला असून माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार अशी शिक्षा कोर्टाने सुनावली आहे.