---Advertisement---

नाशिक शहर पुन्हा हादरले! सातपूर परिसरात इसमाची हत्या

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ५ मे २०२५ । मागील काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारी वाढत चालली असून अगदी क्षुल्लक कारणावरून हत्या करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच मध्यरात्रीच्या सुमारास सातपूर परिसरात एका इसमाची हत्या करण्यात आल्याची घटना आज ५ मे रोजी सकाळी उघडकीस आलीय. या प्रकरणी पोलिसात तपास करत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

नाशिकच्या सातपुर परिसरातील प्रबुद्ध नगरात एका ४५ वर्षीय इसमाचा मध्यरात्रीच्या सुमारास खुन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रबुद्ध नगरात परीसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका ४५ वर्षेीय मृतावस्थेत पडलेला होता. मध्यरात्रीच्या अंधारात हा प्रकार कुणाला कळला नाही. मात्र आज दिवस उजाडल्या नंतर येथून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेला इसम दिसल्याने घटना उघडकीस आली.

घटना लक्षात आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सातपुर पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख हे देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे. पंचनामा करत घटनेचा तपास करताना या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याने हत्या का आणि कशासाठी केली? याचा तपास सातपुर पोलिस करत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---