---Advertisement---

नाशिकच्या व्यावसायिकाला तब्बल ५० लाखांचा गंडा ; अशी केली फसवणूक

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२५ । विविध प्रकारचे आमिष देऊन नागरिकांना गंडविले जात असल्याचे प्रकरण सातत्याने समोर येत असून अशातच नाशिकच्या व्यावसायिकाला गंडा घातलाय. कंपनीचे डिलर बनवण्याचे आमिष देत व्यावसायिकाला तब्बल ५० लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी पुणे येथील संशयितांच्या विरोधात महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कायद्यांतर्गत इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला लेखानगरला एका हॉटेलमध्ये संशयितांनी कंपनीचे मोठे सेमिनार घेत गुंतवणूकदारांना विविध प्रलोभन देत गुंतवणूक करण्यास भाग पाडले होते.

रवींद्र फड (रा. कशिकोनगर, बेळे गार्डन) यांच्या तक्रारीनुसार, ४ जानेवारी २०१४ रोजी संशयित सचिन सुरेश साळुंखे, श्वेता सचिन साळुंखे, कबीर आव्हाड उर्फ मयूर आव्हाड, सुहास आव्हाड (सर्व रा. पिंपरी चिंचवड) यांनी संगनमत करत मे. ग्लोकल फूड वर्क्स प्रा. लि. या कंपनीचे संचालक असल्याचे सांगून फड यांना कॉफी अँड मोअर या कंपनीची पॅन इंडिया ग्लोबल वितरकशीप घेतल्यास आणि कंपनीत थेट गुंतवणूक केल्यास ८० कोटी इक्विटी स्वरुपात देण्याचे आमिष दिले. फड यांनी ५० लाख आणि इतर गुंतवणूकदारांनी २.२५ कोटींची गुं तवणूक केली. वर्ष झाले तरी परतावा न मिळाल्याने पोलिसांत तक्रार केली. वरीष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे तपास करत आहे.

घोटाळ्याची व्याप्ती वाढणार
शहरातील अन्य काही व्यावसायकांनी कंपनीत गुंतवणूक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---