---Advertisement---

नाशिकमार्गे आजपासून नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सुरु, वेळापत्रक आणि थांबे घ्या जाणून

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२५ । नाशिकमार्गे नांदेड आणि मुंबईला जाण्यासाठी नवीन वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरू झाली.नांदेड- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवला. या मार्गावरील ही सर्वात वेगवान गाडी असून इतर गाड्यांच्या तुलनेत कमी वेळेत प्रवास पूर्ण करते.

ही वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून ६ दिवस धावणार आहे. बुधवारी नांदेडवरून आणि गुरूवारी मुंबईवरून ही ट्रेन धावणार नाही. ही ट्रेन ६१० किमी अंतर फक्त ९ तास २५ मिनिटांत पूर्ण करणार आहे. महत्वाचे म्हणजे ही वंदे भारत एक्स्प्रेस २० डब्यांची असणार आहे.नांदेड- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसच्या तिकीटाचे दर देखील समोर आले आहेत. एसी चेअर कारचे तिकीट १,७५० रुपये आणि एक्झिक्युटिव्ह एसी चेअर कारचे तिकीट ३,३०० रुपये असणार आहे.

थांबा कुठे?
नांदेड- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा थांबा परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे, दादर आणि शेवटचा थांबा सीएसएमटी या ठिकाणी असणार आहे.

वेळापत्रक –
वंदे भारत एक्स्प्रेस ०२७०५ ही नांदेडवरून पहाटे ५ वाजता सुटेल आणि दुपारी २.२५ वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई सीएसएमटीवरून दुपारी १.१० वाजता सुटून रात्री १०.५० वाजता नांदेडला पोहोचेल.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---