---Advertisement---

तरुणाच्या निर्घृण हत्येने नाशिक पुन्हा हादरले

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २७ मे २०२५ । नाशिकमधील गुन्हेगारी काही कमी होताना दिसत नसून अशातच तरुणाच्या निर्घृण हत्येने नाशिक हादरले आहे. तरुणांनी केलेल्या मारहाणीत नासीम शाह (२३) याचा मृत्यू झाला असून या घटनेची माहिती गंगापूर पोलीस ठाण्याला देण्यात आली आहे. पोलिसांनी रात्री उशिरा घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

नाशिकच्या शिवाजीनगर परिसरात त्याची तीन ते चार जणांनी निर्घृण हत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत नसीम शहा यांचं याच परिसरात राहणाऱ्या एका मुलीवर प्रेम होतं. त्याने अलीकडेच संबंधित मुलीला प्रपोज केला. याची माहिती मुलीच्या भावाला समजली. बहिणीला प्रपोज केल्याच्या कारणातून त्याने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने नसीमला गाठला.

सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास चारही आरोपींनी नसीमला बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी भयंकर होती, की यात नसीमचा जागीच मृत्यू झाला. मारहाणीच्या घटनेनंतर नसीमला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता, रुग्णालयात जाताच डॉक्टरांनी नसीमला मयत घोषित केलं. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---