---Advertisement---

एसटी महामंडळाच्या नाशिक विभागात नोकरीची संधी; ४४६ जागांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक (MSRTC Bharti 2025) विभागमध्ये शिकाऊ उमेदवार या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ४४६ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. MSRTC Nashik Recruitment

ही पदे भरली जाणार?
एसटी महामंडळात व्होकेशनल (अकाउंट्स आणि ऑडिटिंग), मॅकेनिक मोटार व्हेईकल, शिटमेटल वर्कर, मेकॅमिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर, पेंटर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

पात्रता काय?
याभरतीसाठी उमेदवार १०वी/ आयटीआय पास, पदवीधर असावा. पदांनुसार पात्रता वेगवेगळी असून आवश्यक पात्रतेसाठी उमेदवारांनी जाहिरात पाहावी

एसटी महामंडळातील या नोकरीसाठी १४ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठीचे ठिकाण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, नाशिक विभाग असणार आहे. तुम्हाला नाशिकमध्ये जावे लागणार आहे.या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज सादर करताना अर्जासोबतच तुमचे शैक्षणिक प्रमाणपत्र द्यावे.

या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाइटवर आधी रजिस्टर करावे लागेलय त्यानंतर तुम्हाला अर्ज पाठवावा लागेल. १७ मार्च २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---