---Advertisement---

आनंदाची बातमी ! मान्सून अंदमानात दाखल, नाशिकसह अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व बरसात

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । १३ मे २०२५ । मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्वांसाठी आनंदवार्ता आहे. मान्सून अंदमान समुद्र, दक्षिण बंगालच्या उपसागरातील काही भाग आण निकोबार बेटांमध्ये आज 13 मे रोजीच दाखल झाला असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे. तर केरळमध्ये २७ मे रोजी तर महाराष्ट्रात ६ जून पर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सामान्यतः मान्सून 1 जूनपर्यंत केरळमध्ये आणि 8 जुलैपर्यंत संपूर्ण देशात पसरतो. मात्र, यंदा अनुकूल हवामान परिस्थितीमुळे मान्सून लवकर येण्याची शक्यता आहे. दरम्यान आजपासून महाराष्ट्रातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. आज उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊसा ताशी 50-60 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

weather update

नाशिकमध्ये अवकाळीचे थैमान
दरम्यान नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. मागच्या पाच ते सहा दिवासापासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळं नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पाणी साचत आहे. नाशिक महानगरपालिकेकडून पावसाळापूर्वीचे नालेसफाई आणि भूमिगत गटाऱ्यांची साफसफाई न केल्यामुळे रस्त्यांवर पाणी साचत आहे तर रामकुंड गोदावरी परिसरातील गटारीचे ढापे पूर्णतः बंद झाल्याने गटारीचे पाणी थेट गोदापात्रात मिसळत आहे.

मात्र, आज नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने रामकुंड परिसरात पावसाने वाहून आलेला कचरा आणि ढाप्यांची साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे. तसेच बीड, जालना या परिसरात देखील अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. दरम्यान, या पावसाचा शेती पिकांना पटका बसत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---