नाशिक लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२५ । महाराष्ट्र राज्य अनु.जाती जमाती आयोग, मुंबई च्या सदस्य (सचिव दर्जा) श्रीमती वैदेही वाढाण (Vaidehi Wadhan) ह्या 28 व 29 जानेवारी 2025 रोजी नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
मंगळवार 28 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह नाशिक येथे आगमन, दुपारी 12 ते 1.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक समिती सभागृह येथे अनु.जाती जमाती कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांच्या बाबत मा. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, नाशिक यांच्या समवेत आढावा व चर्चा. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नाशिक यांच्याकडे असलेल्या अनु.जातीच्या संपूर्ण योजनांचा आढावा व चर्चा त्या करणार आहेत. दुपारी 1.30 ते 2.30 या वेळेत राखीव असून दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह नाशिक येथे त्या पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. दुपारी 3.30 ते 4.30 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक, समिती सभागृह येथे त्या प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास नाशिक व कळवण यांच्या समवेत आदिवासी विभागाच्या विविध योजनेबाबत आढावा व चर्चा करणार आहेत. सायंकाळी 5 ते 6 या वेळेत अनु.जाती जमातीच्या विविध संघटनेसोबत चर्चा व अनु.जाती जमातीच्या व्यक्तींचे निवेदने स्वीकारणार आहेत.
बुधवार दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक समिती सभागृह येथे नियोजित प्रकरणांच्या सुनावण्या श्रीमती वाढाण घेणार आहेत. दुपारी 1 ते 2 यावेळेत राखीव असणार आहेत. दुपारी 2 ते 4 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक समिती सभागृह येथे नियोजित प्रकरणांच्या सुनावण्या होणार असून सोयीनुसार वाहनाने त्या पालघरला प्रयाण करतील.