---Advertisement---

माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा ; नाशिकच्या सत्र न्यायालयाकडून शिक्षेला स्थगिती

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२५ । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून त्यांना शिक्षेपासून स्थगित दिली आहे. न्यायलयाच्या या निर्णयामुळे माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवरील संकट टळले आहे.

माणिकराव कोकाटे यांच्यावर 30 वर्षांपूर्वी सदनिका लाटल्याचा आरोप होता. मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका मिळविण्यासाठी खोटी कागदपत्रे देऊन लाटण्याच्या प्रकरणात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि 50 हजारांचा दंड ठोठाविण्यात आला आहे. यामुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपदच नव्हे तर आमदारकीही धोक्यात आली होती.

मात्र यासंदर्भात त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती.अखरे आज कोर्टाने आपला निकाल सुनावताना माणिकराव कोकाटे यांना शिक्षेपासून स्थगित दिली आहे. त्यामुळे कोकाटे यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---