---Advertisement---

नाशिकमध्ये हत्येचे सत्र थांबेना ! फुलेनगरमध्ये डोक्यात दगड घालून एकाची हत्या

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २ जून २०२५ । नाशिकमधून हत्येच्या घटना सातत्याने समोर येत असून यामुळे शहातील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच नाशिकच्या फुलेनगरमध्ये डोक्यात दगड घालून एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. संजय तुळशीराम सासे असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी नाशिक पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे.

या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. मृत व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या पेठ रोडवरील फुलेनगरमधील गौडवाडीमध्ये ही हत्येची घटना घडली. संजय तुळशीराम सासे या व्यक्तीची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. महापालिकेच्या ५६ नंबर शाळेसमोर हा हत्येचा थरार घडला. मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास त्यांची हत्या करण्यात आली.

काही अज्ञात व्यक्तींनी संजय सासे यांना वाटेत गाठून त्यांच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. संजय सासे हे बाबागिरी करत असल्याची स्थानिकांची माहिती. याच कारणावरून त्यांची हत्या झाल्याचा संशय आहे. रुपाली संजय सासे यांच्या फिर्यादीवरून याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका संशयिताला अटक केली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---