---Advertisement---

Malegaon : १५ वर्षीय तरूणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या ; नुकतीच दिली होती दहावीची परीक्षा

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२५ । मालेगावात अल्पवयीन तरूणीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. संगीता राऊत असे मृत तरूणीचे नाव असून नुकतीच मार्च महिन्यात इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. परिक्षेनंतर अवघ्या काही आठवड्यात तिने टोकाचं पाऊल उचललं आहे.संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. अल्पवयीन तरूणीने आत्महत्या का केली? याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. आत्महत्येच्या या बातमीमुळे गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

संगीता राऊत ही राजुरा गावातील रहिवासी होती. तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी गावात सात वर्षीय चरण बोंढारे या चिमुकल्याचा मृत्यू आगीमुळे झाला होता. या दुखा:तून गाव सावरत असतानाच संगीताने आत्महत्या केल्याची घटना समोर आली. या दोन्ही घटनांमुळे गावातील वातावरण अधिकच भावनिक झाले आहे. या घटनेचा अधिक तपास मालेगाव पोलीस करीत असून, पोलिसांनी प्राथमिक माहिती गोळा करून तपासाला सुरूवात केली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---