---Advertisement---

महायुतीकडून विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर; कोणत्या पक्षातून कोणाला संधी?

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२५ । विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जांगासाठी येत्या 27 मार्चला पोटनिवडणूक होत आहे. या जागांसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान या रिक्त पाच जागांसाठी महायुतीकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहे.

या निवडणुकीसाठी भाजपने रविवारी आपल्या तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यानंतर आज शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपला उमेदवार जाहीर केला आहे.

भाजपकडून कोणाला संधी?
महायुतीमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. भाजपकडे विधान परिषद निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक होते. भाजपने आपल्या तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. संदीप जोशी, संजय केणेकर, दादाराव केचे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे.

तर शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी आणि अजित पवार गटाकडून संजय खोडके यांना संधी देण्यात आली आहे. आज राष्ट्रवादीचे संजय खोडके आज दुपारी उमेदवारी अर्ज भरणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. चंद्रकांत रघुवंशी देखील आज दुपारी वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थिती अर्ज भरणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---