---Advertisement---

राज्यात पावसाला पोषक वातावरण; आजपासून पुढचे चार दिवस या जिल्ह्यांना अलर्ट

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२५ । गेल्या आठवडाभरापासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली मात्र आता अरबी समुद्रावर पावसाला पोषक वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय झाल्याने पुढील चार दिवस राज्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. नाशिकमध्येही पावसाची प्रतीक्षा असून हवामान खात्याने २३ जुलै रोजी पावसाचा अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाचा अंदाज काय?
बंगालच्या उपसागरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे उपसागराच्या भागात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. दरम्यान अरबी समुद्रावरही जोरदार वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय झाल्या असून कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र व महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील चार दिवस कोकण किनारपट्टी विदर्भ मराठवाड्यातील काही भागांना पावसाचे तीव्र इशारे देण्यात आलेत. मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाची उसंत राहील. मात्र घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कुठे कोणते अलर्ट?

22 जुलै: ऑरेंज अलर्ट -रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,सातारा कोल्हापूर घाटमाथा
यलो अलर्ट :मुंबई, ठाणे, पालघर,पुणे घाटमाथा,धाराशिव, लातूर, नांदेड,अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली
23 जुलै : ऑरेंज अलर्ट – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,कोल्हापूर -सातारा -पुणे घाटमाथा
यलो अलर्ट- मुंबई, ठाणे, पालघर,नाशिक घाटमाथा,यवतमाळ ,चंद्रपूर, गडचिरोली
24 जुलै : ऑरेंज अलर्ट – ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली,पुणे -सातारा – कोल्हापूर घाटमाथा
यलो अलर्ट – मुंबई, पालघर, नाशिक घाटमाथासह वाशिम ,बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा
25 जुलैः ऑरेंज अलर्ट – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,भंडारा, पुणे – सातारा – कोल्हापूर घाटमाथा
यलो अलर्ट : मुंबई ,ठाणे, संपूर्ण विदर्भ,हिंगोली नांदेड

पुढील चार दिवस कसे राहणार हवामान?
राज्यात पुढील चार दिवस मुंबई उपनगरासह संपूर्ण कोकणपट्टी तसेच घाट माथ्यावर पावसाचे तीव्र अलर्ट देण्यात आले आहेत. संपूर्ण विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाची उघडीप राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद होईल असे हवामान विभागाने सांगितले आहे .

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---