नाशिक लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२५ । महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना आणखी एक धक्का बसला आहे. केंद्रातील मोदी सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली. सरकारने १४ किलोच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ केली आहे.
घरगुती गॅस सिलिंडर आणि उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या सिलिंडरवर ही दरवाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांचं किचन बजेट कोलमडणार आहे.
आता इतके रुपये मोजावे लागणार
सामान्य ग्राहकांसाठी १४.२ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत ८०३ रुपयांवरून ८५३ रुपये होईल आणि उज्ज्वला योजनेअंतर्गत येणाऱ्या ग्राहकांसाठी १४.२ किलो सिलिंडरची किंमत ५०३ रुपयांवरून ५५३ रुपये होईल.