---Advertisement---

आनंदाची बातमी! एलपीजी गॅस सिलिंडर झाला स्वस्त; जाणून घ्या किती रुपयांनी?

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२५ । सर्वसामान्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. तेल कंपन्यांनी १९ किलो वजनाच्या कमर्शियल सिलिंडरच्या किंमतीत ५८.५० रुपयांनी कपात केली आहे. सुधारित किमती आज, १ जुलै २०२५ पासून लागू झाल्या आहेत.

त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबा अशा व्यवसायिकांना दिलासा मिळाला आहे. या ठिकाणी कमर्शियल गॅस वापरला जातो. दरम्यान, घरगुती एलपीजी गॅसच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.या किंमती जशाच तशा आहेत.

दर महिन्याच्या एक तारखेला एलपीजी गॅसच्या नवीन किंमती जाहीर होत असतात. आज पुन्हा ऑइल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या नवीन किंमती अपडेट केल्या आहेत. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी १९ किलो वजनाच्या कमर्शियल सिलिंडरच्या किंमतीत ५८.५० रुपयांनी कपात केली आहे. यामुळे मुंबईत १९ किलो वजनाच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरची किंमत १६१६ होणार आहे. ही किंमत मे महिन्यात १६९९ रुपये होते.

इतर शहरांमध्येही सिलिंडरच्या किंमतीत कपात झाली आहे. दिल्लीत १९ किलो वजनाचे सिलिंडरची किंमक आजपासून १६६५ रुपये होणार आहे. ही किंमत याआधी १७२३.५० रुपये होती. कोलकत्तामध्ये सिलिंडरची किंमत १७६९ रुपये झाली आहे. या किंमतीत ५७ रुपयांनी घट झाली आहे.याआधीही जून महिन्यात एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल झाला होता. कमर्शियल गॅसच्या किंमतीत २४ रुपयांनी घट झाली होती. त्यामुळे सलग दुसऱ्या महिन्यात एलपीजी गॅसच्या किंमती कमी झाल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---