---Advertisement---

नाशिक जिल्ह्यातील नऊ खतविक्रेत्यांचे परवाने रद्द ; कारण जाणून घ्या..

fertilizer
---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । बागलाण तालुक्यातील काही कृषी सेवा केंद्र भेसळयुक्त खते व खतांसोबत अनावश्यक खत घेण्यास भाग पाडत जास्त दराने खतांची विक्री करत असून अशा कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेतर्फे बागलाण तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना दिला होता.

याबाबत चौकशी करून जिल्हा कृषी परवाना अधिकाऱ्यांनी दोषी विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. त्यांनी बागलाणमधील ३, देवळ्यातील २, कळवणमधील ३, आणि नाशिकमधील १ अशा जिल्ह्यातील नऊ खतविक्रेत्यांचे परवाने रद्द केले आहेत. यामधील बागलाण तालुक्यातील जोगेश्वरी एजन्सी, कृष्णा अॅग्रो, कसमादे अॅग्रो (जायखेडा) यांचा समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---