नाशिक लाईव्ह न्यूज । ५ मे २०२५ । मे महिना संपून जून उजाडला. तरी अद्याप मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला नाहीय. अशातच मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण, आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे १५०० पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी स्वतः ही माहिती दिली आहे.
मंत्री अदिती तटकरे यांनी ट्वीट करत लाडकी बहीण योनजेच्या हप्त्याबाबत माहिती दिली आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलं, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : मे महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड् बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे.
लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये राज्य सरकारकडून देण्यात येत असतात. पात्र महिलांच्या बाँक खात्यात थेट डीबीटी मार्फत पैसे जमा होत असतात. आतापर्यंत एकूण 10 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आले आहेत. आता मे महिन्याचा म्हणजेच 11वा हप्ता तर जून महिन्याचा 12वा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे.
महिलांच्या खात्यात पैसे आले की नाही असं करा चेक
लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही घरबसल्या चेक करु शकतात. तुम्हाला फक्त तुमच्या बँकेच्या अॅपवर जाऊन अकाउंट बॅलेंस चेक करु शकतात. याचसोबत तुम्ही बँकेत जाऊन पासबुकवर एन्ट्री करुन घेऊ शकतात. पासबुकवर तुम्हाला कधी किती पैसे तुमच्या खात्यात जमा झाले याबाबत सर्व माहिती मिळेल.









