---Advertisement---

संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फरार कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसला

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२५ । बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून मात्र या हत्याकांडातील प्रमुख आंरोपींपैकी एक असलेला कृष्णा आंधळे हा अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. या प्रकरणाला तीन महिने उलटून गेले तरी अद्यापही कृष्णा आंधळे हा पोलिसांच्या हाती लागला नसून यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत असताना नाशिकमध्ये आता पुन्हा कृष्णा आंधळे दिसल्याचा दावा करण्यात येत आहे. यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या गंगापूर रोडवरील दत्त मंदिर चौकात मंदिराजवळ कृष्णा दिसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्याच्यासोबत आणखी एक इसम होता. ते दोघेही काळ्या रंगाच्या बाईकवर बसून गेल्याचा दावाही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांकडून सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करून खातरजमा करत आहेत. याआधी जानेवारी महिन्यात देखील कृष्णा आंधळे दिसल्याची चर्चा होती. नाशिकमध्ये आता पुन्हा कृष्णा आंधळे दिसल्याचा दावा करण्यात येत आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य संशयित वाल्मिक कराड याच्यासह इतर आरोपी तुरुंगात आहेत. कृष्णा आंधळे हा या हत्याकांडातील नववा आरोपी असून तो अद्याप फरार आहे. सरपंच देशमुख यांना मारहाण सुरु असताना कृष्णा आंधळेने आरोपींच्या मोकारपंती या व्हाट्सपग्रुपवर व्हिडीओ कॉल केल्याचे समोर आले आहे. हत्येच्या गुन्ह्यात सहभागी असलेला कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---