---Advertisement---

नाशिक बाजार समितीच्या सभापतीपदी कल्पना चुंभळे बिनविरोध

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२५ । माजी खासदार तसेच बाजारसमिती माजी सभापती देविदास पिंगळे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर आज बुधवार, (दि. १९) रोजी घेण्यात आलेल्या बाजारसमिती सभापतीपदी निवडणुकीत कल्पना चुंभळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्या पहिल्या महिला सभापती ठरल्या आहेत.

सभापती देवीदास पिंगळे यांच्या मनमानी कारभाराला विरोध करत संचालकांनी एकत्र येत त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. पिंगळे यांच्या गटातीलच काही नाराज संचालक माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या नेतृत्वाखाली आले आणि नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली. सभापतीपदासाठी माजी सभापती शिवाजी चुंभळे आणि कल्पना चुंभळे यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर सभापतीपदी कल्पना चुंभळे यांची बिनविरोध निवड झाली.

गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीचे काही संचालक सहलीवर गेले होते, मात्र मंगळवारी (दि.१८) दुपारी हे संचालक नाशिकमध्ये परतले होते. त्यानंतर आज सकाळी ११ वाजता थेट बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीत दाखल झाले. यानंतर सभापतीपदासाठी अर्ज मागविण्यात आले असता कल्पना चुंभळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सभापतीपदी निवड करण्यात आली.

या निवडणुकीसाठी विरोधी संचालक शिवाजी चुंबळे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. मंत्री गिरीश महाजन यांनीही मदत केली. त्यामुळे या सर्व राजकीय घडामोडी एकतर्फी झाल्या.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---