---Advertisement---

दहावीचा पेपर फुटला रे भो; कॉफीमुक्त अभियानाचा उडाला फज्जा..

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२५ । आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटला आहे. जालन्यातील बदनापूर परीक्षाकेंद्रावर मराठीचा पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांतच प्रश्नपत्रिका बाहेर आली, आणि त्यानंतर उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या गेल्या. परंतु या प्रकारामुळे परीक्षा मंडळाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी केलेली जय्यत तयारीचा फज्या उडल्याचे समोर आले आहे.

राज्यामध्ये आज शुक्रवारपासून (२१ फेब्रुवारी) दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू झाली. या परीक्षेसाठी शिक्षण मंडळाने मोठी तयारी केली होती. कॉपी मुक्ती अभियानासाठी अनेक पावले उचलली होती. त्यासंदर्भात माध्यमांमध्ये मंडळाने परीक्षा सुरळीत होणार असल्याचा दावा केला होता. परंतु माय मराठीचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे पेपरला कॉफीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे

आज शुक्रवारी सकाळी 11 वाजता परीक्षेला सुरुवात झाली. त्यानंतर जालना येथे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये प्रश्नपत्रिका बाहेर आली. जालन्यातील बदनापूर येथील केंद्रावर हा प्रकार घडाला. या ठिकाणी असलेल्या एका झेरॉक्स सेंटरवर थेट उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स मारून विद्यार्थ्यांना पुरवला गेला. जालना शहरातील झेरॉक्ससेंटरमधून उत्तरपत्रिकांच्या प्रिंटाकाढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पालक संतप्त झाले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---