नाशिक लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इस्रोमध्ये काही रिक्त पदांसाठी मोठी पदभरती निघाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याचा विचार करणारे उमेदवार इस्रोच्या अधिकृत वेबसाइट www.isro.gov.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जून २०२५ पर्यंत आहे. या भरतीद्वारे एकूण ३२० रिक्त जागा भरल्या जाणार असून पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा.
रिक्त पदाचे नाव :
1) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Electronics) 113
2) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Mechanical) 160
3) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Computer Science) 44
4) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Electronics)-PRL 02
5) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Computer Science)-PRL 01
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 65% गुणांसह B.E/B.Tech (Electronics & Communication)
पद क्र.2: 65% गुणांसह B.E/B.Tech (Mechanical)
पद क्र.3: 65% गुणांसह B.E/B.Tech (Computer Science)
पद क्र.4: 65% गुणांसह B.E/B.Tech (Electronics & Communication)
पद क्र.5: 65% गुणांसह B.E/B.Tech (Computer Science)
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १६ जून २०२५ रोजी १८ ते २८वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, काही श्रेणींना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
किती पगार दिला जाईल?
निवडलेल्या उमेदवारांना दरमहा ५६,१०० रुपये पगार मिळेल. याशिवाय, एचआरए, डीए आणि इतर सरकारी भत्ते देखील उपलब्ध असतील.
किती शुल्क भरावे लागेल?
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ₹७५०/- शुल्क भरावे लागेल
अर्ज कसा करायचा?
या भरतीसाठी, सर्वप्रथम तुम्ही इस्रोच्या अधिकृत वेबसाइट www.isro.gov.in वर जा.
यानंतर तुम्हाला भरती विभागात जावे लागेल.
नवीन पृष्ठ उघडल्यावर, तुम्हाला भरतीशी संबंधित लिंक मिळेल.
येथे अप्लाय नाऊ टॅबवर क्लिक करा आणि सर्व आवश्यक माहिती योग्यरित्या भरा.
आता कागदपत्रे आणि शुल्क सबमिट करून फॉर्म सबमिट करा.
शेवटी पृष्ठ डाउनलोड करा आणि त्याचे प्रिंटआउट घ्या.
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज |
Apply Online |