नाशिक लाईव्ह न्यूज । २९ मे २०२५ । वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणात पोलिस महासंचालक जालिंदर सुपेकर यांचे नाव सातत्याने समोर येत असून याच दरम्यान गृहविभागाने मोठी कारवाई केली. जालिंदर सुपेकर यांच्याकडून नाशिक, संभाजीनगर, नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढण्यात आला आहे.
जालिंदर सुपेकर हे वैष्णवीचा पती शशांक हगवणे याचे मामा आहेत. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मामे-सासरे विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी हगवणे कुटुंबास मदत केल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपूर्वी करण्यात आला. तर या घटनेच्या निमित्ताने सुपेकर यांचा आणखी एक कारनामा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उघड केला आहे. त्यांनी माध्यमांसमोर सादर केलेली ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर गृहमंत्रालय काय निर्णय घेणार? सुपेकरांची चौकशी होणार का? अशा चर्चा रंगल्या होत्या.
अशात आज गृहविभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. जालिंदर सुपेकर यांच्याकडून नाशिक, संभाजीनगर, नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढण्यात आला आहे.जालिंदर सातपुते हे पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे महानिरिक्षक आहेत. त्यांच्याकडे संभाजी नगर , नाशीक आणि नागपुरच्या कारागृह उपमहानिरिक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. हा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडून काढून घेण्यात आलाय. वैशनव हगवणे प्रकरणात सुपेकरांवर आरोप झाले आहेत.
जालिंदर सुपेकर यांच्याकडून हा पदभार काढून घेतल्यानंतर, नागपूरची जबाबदारी उपमहानिरीक्षक स्वाती साठे, नाशिकची जबाबदारी अधीक्षक अरुणा मुगटराव आणि नागपूरची जबाबदारी अधीक्षक वैभव आगे या तीन अधिकाऱ्यांकडे सोपवली आहे.