नाशिक लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । भारतीय हवाई दलात नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय हवाई दलाने ग्रुप सी पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. विशेष या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून या भरतीसाठी १० वी आणि १२वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्ज भरण्याची प्रक्रिया १७ मे २०२५ रोजी सुरू झाली आहे आणि ती १५ जून २०२५ रोजी संपेल. ज्यांना या पदासाठी अर्ज करायचा आहे ते या तारखांच्या दरम्यान अर्ज करू शकतात. शेवटच्या क्षणी होणारा त्रास टाळण्यासाठी उमेदवारांनी शक्य तितक्या लवकर अर्ज करावा.
भारतीय हवाई दलात लोअर डिव्हिजन क्लर्क, हिंदी टायपिस्ट, कुक, स्टोअर कीपर, सुतार आणि एमटीएस सारख्या बऱ्याच पदांसाठी या भरती घोषित करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, तेजपूर आसाम येथील एअर ऑफिसर कमांडिंग एअर फोर्स स्टेशनसाठी लोअर डिव्हिजन क्लर्कच्या 1 पदासाठी, वेस्टर्न एअर कमांड (IAF) मध्ये हिंदी टायपिस्टच्या 1 पदासाठी, एअर फोर्स सेंट्रल अकाउंट्स ऑफिस (AFCAO), IAF मध्ये लोअर डिव्हिजन क्लर्कच्या 3 पदांसाठी रिक्त जागा आहेत.
MTS, LDC Clerk: पात्रता
या आयएएफ सरकारी नोकरीच्या पदांसाठी वेगवेगळ्या पात्रता निश्चित करण्यात आल्या आहेत. एलडीसी क्लर्क पदासाठी बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांना प्रति मिनिट 30 शब्द हिंदी आणि प्रति मिनिट 35 शब्द इंग्रजी टायपिंग असणं अनिवार्य आहे.
12 वी उत्तीर्ण उमेदवार स्टोअर कीपर पदासाठी अर्ज करू शकतील. तर सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, कुक पेंटर, सुतार, हाऊसकीपिंग स्टाफ, मेस स्टाफ, एमटीएस पदांसाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
फॉर्म भरण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे. तसेच, राखीव उमेदवारांना वयोमर्यादेत सूट मिळेल.
या हवाई दलाच्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी/प्रॅक्टिकल/शारीरिक चाचणी इत्यादी टप्प्यांतून करण्यात येईल.