नाशिक लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२५ । राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा जोरदार झटका लागला आहे. तो म्हणजे राज्यात आजपासून दुधाचे नवे दर लागू झाले आहेत. यामुळे आता दूध खरेदीसाठी आणखी पैसे मोजावे लागणार आहे. आजपासून ही दरवाढ लागू झाली आहे.
दुधाच्या दरामध्ये २ रुपयांनी वाढ झाली आहे. दुधाच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे आता गाई आणि म्हशीचे दूध खरेदी करण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे.
नवे दर
नव्या दरवाढीनुसार आता एक लिटर गाईच्या दुधासाठी ५६ ते ५८ रुपये मोजावे लागणार आहे. तर सध्या म्हशीच्या एक लिटर दुधासाठी ७० ते ७२ रुपये मोजावे लागत आहेत. नव्या दरवाढीनुसार म्हशीच्या दुधासाठी ७२ ते ७४ रुपये मोजावे लागणार आहे.
बुधवारी दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कात्रज डेअरीमध्ये दूध दरवाढीबाबत महत्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये एकमताने हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये विविध सहकारी आणि खासगी संघांचे ४७ प्रतिनिधी उपस्थित होते.