नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिक मधील चांदवड तालुक्यातून अत्याचाराचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. विटावे गावात अल्पवयीन दोन मुलींवर सरपंचासह अन्य एकाने वेळोवेळी बलात्कार केल्याची आणि त्यांना पीडितांच्या आजीनेच सहकार्य केल्याची घटना समोर आलीय.
साधारण मार्च २०२३पासून सुरू असलेल्या अत्याचाराने त्रस्त १६ वर्षीय पीडितेने अखेर पोलिस ठाण्यात धाव घेत कैफियत मांडली. संशयित सरपंच साईनाथ कोल्हे आणि संजय पवार यांनी पीडितांच्या आजीला पैसे देऊन दोन्ही बहिणींचा ताबा मिळवला. त्यानंतर त्र्यंबक, शिर्डी येथे नेत वेळोवेळी अत्याचार केलेत. या प्रकारास नकार दिला असता आजीने दोघींना चावा घेत घरात डांबल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी गंभीर प्रकरणी पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवत तिघा संशयितांना अटक केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी बाजीराव महाजन हे अधिक तपास करीत आहेत.