नाशिक लाईव्ह न्यूज । ९ मे २०२५ । नाशिकच्या सातपूर परिसरात राजवाडा येथे लग्नाला जाण्यावरून झालेल्या भांडणात संतपालेल्या नवऱ्याने बायकोच्या मानेवर धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आलीय. सिंदुबाई पीठे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान हत्येनंतर नवरा फरार झाला असून त्याच्याविरुद्ध सातपूर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सातपूर परिसरात राजवाडा येथे सिधुबाई पीठे या महिलेची पतीने हत्या केली. मुलगा रात्री पावणे बारा वाजता कामाहून घरी आला असता त्याला आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. आईची अवस्था बघून मुलाने आराडाओरडा केल्याने परिसरातील नागरीक मदतीला धावून आले. सिंधूबाई यांच्या मानेवर धारधार शस्त्राने वार करून त्यांची नवऱ्याने हत्या केली.
मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने सिंधूबाई यांचा जागीच मुत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी माहिती घेतली असता नवरा-बायको यांच्यात वाद झाल्यानंतर ही घटना घडल्याचे समोर आले. भांडणानंतर नवऱ्याने कोयत्याने बायकोच्या मानेवर जबर वार केले. या हल्ल्यात सिंधूबाई यांचा जागीच मृत्यू झाला.
बायकोच्या हत्येनंतर नवरा फरार झाला. याप्रकरणी नाशिकच्या सातपूर पोलिस ठाण्यात नवऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित नालावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर गुन्हे शोध पथक करीत आहेत.