नाशिक लाईव्ह न्यूज । व्हॅन आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात पती-पत्नीचा जागेवर मृत्यू झाल्याची घटना नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर पिंपरखेड टोलनाक्याजवळ घडली. अमोल माळी व कारचा चालक राजेंद्र परदेशी (रा. नागद) हे दोघे गंभीर जखमी झाले.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ वर गुरुवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान दुचाकी व व्हॅन यांची समोरासमोर घडक झाली. हा अपघात इतका जबरदस्त होता की अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला तर व्हॅन बाजूच्या नाल्यात फेकली गेली अपघातात दुचाकी वर बसलेले भाऊराव माळी व त्यांच्या पत्नी लंकाबाई माळी यांचा जागीच मृत्यू झाला तर अमोल माळी गंभीर जखमी झाले.
व्हॅनमधील जखमी चालकाला पिंपरखेड परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने वाहनातून बाहेर काढून नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले अपघात प्रकरणी व्हॅनचालक राजेंद्र परदेशी याच्या विरोधात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे