---Advertisement---

हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये भरघोष पगाराच्या नोकरीची संधी ! 372 जागांसाठी भरती सुरु

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये मोठी पदभरती जाहीर करण्यात आलीय. ज्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरु असून पात्र उमेदवारांनी मुदतीपूर्व अर्ज करावा. या भरतीद्वारे एकूण ३७२ रिक्त पदे भरली जाणार आहे.

फ्रेशर्सपासून ते अनुभवी प्रोफेशनलपर्यंत अनेकांसाठी ही भरती केली जाणार आहे. या भरतीद्वारे एकूण ३७२ रिक्त पदे भरली जाणार आहे. १ जून ते ३० जून २०२५ पर्यंत तुम्ही अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे.

हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह, मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल / सिव्हिल / केमिकल इंजिनियर्स, लॉ ऑफिसर, सेफ्टी ऑफिसर, सिनियर ऑफिसर आणि मॅनेजर पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित क्षेत्रात डिप्लोमा, बी.टेक आणि लॉ डिग्री प्राप्त केलेली असावी.

हिंदुस्तान पेट्रोलियममधील या नोकरीसाठी तुम्ही www.hindustanpetroleum.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कॉम्प्युटर बेस्ड टेस्टद्वारे केली जाणार आहे.

हिंदुस्तान पेट्रोलियममधील फ्रेशर्ससाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२५ आहे. तर अनुभवी उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२५ आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

हिंदुस्तान पेट्रोलियममधील ही भरती वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. फ्रेशर्ससाठी काही जागा राखीव आहेत तर काही जागा या अनुभवी उमेदवारांसाठी राखीव आहेत.त्यामुळे पदानुसार तुम्ही अर्ज करावेत. या नोकरीसाठी एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, ज्युनिअर असिस्टंट पदासाठी ३०,००० ते १,२०,००० रुपये पगार मिळणार आहे. असिस्टंट ऑफिसर पदासाठी ४०,००० ते १,४०,००० रुपये पगार मिळणार आहे.इंजिनियर पदासाठी ५०,००० ते १,६०,००० रुपये पगार मिळणार आहे. असिस्टंट मॅनेजर पदासाठी ७०,००० ते २,००,००० रुपये पगार मिळणार आहे.डेप्युटी जनरल मॅनेजर पदासाठी १,२०,००० ते २,८०,००० रुपये पगार मिळणार आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---