---Advertisement---

नवीन संधीचे दार उघडणार ; 31 जानेवारीचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल? घ्या जाणून

---Advertisement---

मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी परिणाम घेऊन येईल. आज तुम्ही मौजमजेच्या आणि आनंदाच्या मूडमध्ये असाल. जर तुम्ही एखाद्याला कर्ज दिले असेल तर तुम्ही ते सहजपणे परत करू शकता. तुमच्या घराच्या नूतनीकरणावरही तुम्ही चांगले पैसे खर्च कराल.

वृषभ : आजचा दिवस तुमच्यासाठी आशेने भरलेला असणार आहे. एकाच वेळी अनेक कामे करावी लागत असल्याने तुम्हाला अधिक लक्ष द्यावे लागेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या चांगल्या विचारसरणीचा तुम्हाला फायदा होईल. तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या लग्नातील अडथळा दूर होईल. आज काही नवीन विरोधक उदयास येऊ शकतात जे तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील.

मिथुन : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. पाहुण्यांच्या आगमनाने वातावरण आल्हाददायक असेल. जर तुम्ही तुमच्या सासरच्या व्यक्तीकडून पैसे उधार घेण्याचा विचार केला असेल तर तुम्हाला ते पैसे सहज मिळतील.

कर्क : नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस आनंद घेऊन येणार आहे. जर तुम्ही दुसरी नोकरी शोधत असाल तर तुम्हाला चांगली संधी मिळू शकते. तुमच्या मनात कोणाबद्दलही वाईट भावना ठेवू नका. जर कोणी तुमच्याकडून पैसे उधार घेतले असतील तर तो ते तुम्हाला परत करू शकतो.

सिंह – संततीच्या पराक्रमावर खुश व्हाल. त्यांचे कौतुक पाहण्यात एक वेगळा आनंद होईल. सिंहाची छाती घेऊन वाटचाल कराल. मनाला खंबीरपणाचे वलय प्राप्त होईल.

कन्या – पोटाच्या तक्रारी वाढतील. हितशत्रू त्रास देतील. आजोळी मात्र प्रेम राहील. दिवस संमिश्र आहे. कामात व्यस्त राहणे बरे राहील.

तूळ – देवी उपासना फलदायी ठरेल. प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळेल. विद्यार्थी वर्गासाठी दिवस सुवार्ता घेऊन येणार आहे. आपली सृजनशीलता वाढेल.

वृश्चिक – गृहसौख्य, वाहनसौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. घरी पाहुण्यांचे आगमन होईल. मन स्वस्थ राहिल्यामुळे दिवस आनंदी जाईल.

धनु -आयुष्याचा कार्यकारण भाव आज जाणा. नवीन गोष्टी हिरीरीने भाग घेऊन करा. यश आपलेच आहे. हे नक्की समजून घ्या.

मकर – वाणीवर नियंत्रण ठेवणे आज गरजेचे आहे. आपल्याकडून कोणी दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्या. धन योगाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.

कुंभ – आपले सकारात्मक प्रतिबिंब तुम्हालाच जाणवेल. एक वेगळी उमेद आणि आशेची लहर घेऊन दिवस आलेला आहे. आणि तो छान जाणार आहे.

मीन – पावलांशी निगडित आजार होतील. परदेशातही काहीजणांना प्रवासाची शक्यता आहे. धार्मिक बैठक आणि अध्यात्मिक उपासना या जोरावर दिवसाचा डोलारा आहे, हे जाणून घ्या.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---