---Advertisement---

Nashik : सूक्ष्म व लघु उद्योग उपक्रम धारकांनी जिल्हा पुरस्कारसाठी 10 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करावेत

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । शासनाने लघु उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील दोन लघु घटकांना जिल्हा पुरस्कार योजना सुरू केली आहे. सन 2024 साठी जिल्ह्यातील सूक्ष्म व लघु उद्योग उपक्रम धारकांनी या पुरस्कारसाठी 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत करावेत, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र नाशिक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

पुरस्काराचे स्वरूप प्रथम पुरस्कार रूपये 15 हजार रोख, मानचिन्ह, शाल व श्रीफळ आणि द्वितीय पुरस्कार रूपये 10 हजार रोख, मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे. सन 2024 करीता जिल्हा पुरस्कारसाठी सूक्ष्म व लघु उद्योग उपक्रम 1 जानेवारी 2021 ला अथवा त्यापूर्वी स्थायी लघु उद्योग/ उद्योग आधार/ उद्यम नोंदणी झालेला असावा. उद्योग घटक मागील सलग दोन वर्ष उत्पादनात असावा. यापूर्वी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व जिल्हा पुरस्कार प्राप्त घटक या पुरस्कारासाठी पात्र ठरणार नाहीत. तसेच उद्योग घटक वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. असे पात्रतेचे नियम आहेत.

जिल्हा पुरस्कारासाठी उद्योग घटकाची स्थिर मत्ता, उत्पादन व कामगार यांच्यातील वाढ, तंत्रज्ञान कौशल्य, उद्योजकाची पार्श्वभूमी, उद्योगसाठी निवडलेली जागा, उत्पादनात केलेला विकास व गुणवत्ता, आयात-निर्यात, नवीन उत्पादनासाठी धडपड, घटकांचे व्यवस्थापन व अकांऊटिंग सिस्टिम, यंत्रसामग्रीची सर्वसाधारण स्थिती, इमारत व यंत्र सामग्रीची देखभाल, कामगारांसाठी कल्याणकारी योजना, अनु.जाती/ जमाती चे उद्योजक असे निकष लावले जातात, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---