नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिकमध्ये हिट अँड रनची घटना घडली असून यात पिकअप वाहनाने तीन दुचाकी, एक ओमीनी कारसह अन्य आणखी दाेन वाहनांना धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वार २३ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. जयश्री सोनवणे असं अपघात मयत झालेल्या तरुणीचे नाव असून या घटनेत जयश्रीचा भाऊ सुमित गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या साखळी अपघातात जयदेव महाले, भारत महाले हे देखील जखमी झाले आहेत. संशयित आरोपी अनिल साळवे या वाहनाचालकाने पिकअप वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाला. तीन दुचाकी, एक ओमीनी कारसह अन्य आणखी दाेन वाहनांना पिकअपने धडक दिली.
संशयित आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली असून तर चालकासोबत मांडीवर असलेल्या त्याच्या मुलाने एक्सलेटर दाबल्याने हा अपघात झाल्याचा वाहनचालकाचा दावा आहे. अपघात प्रकरणी म्हसरूळ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या कायद्यात हिट अँड रनचे प्रकरण असेल, तर आरोपीने पोलिसांना कळवले. घटनेतील जखमींना हॉस्पिटलमध्ये नेले किंवा घटनास्थळांवरून पळून गेले तरी सारखीच शिक्षा होत होती. दोन वर्षांचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा, अशी तरतूद होती. परंतु आता या कायद्यामध्ये बदल झालाय. तो नेमका काय आहे?