---Advertisement---

Nashik : नाशिक शहरात भांगेच्या गोळ्यांचा कारखाना उद्ध्वस्त; लाखोंचा मुद्देमाल जप्त

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२५ । महाराष्ट्रात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. यातच आताची तरुण पिढी ड्रग्स, गांजा अशा अनेक अंमली पदार्थांच्या आहारी जात आहे. त्याचदरम्यान नाशिक एमडीनंतर आता भांगेच्या गोळ्या तयार करणारा कारखाना उध्वस्त करण्यात आला आहे. तसेच भांगविक्री करणाऱ्यांना दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

कारखान्यावर छापा टाकत ६ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नाशिक पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तयार केलेल्या भांगांच्या गोळ्यांसह तयार करण्यासाठी लागणारे साहित्य देखील हस्तगत करण्यात आलेलं आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---