नाशिक लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक अंतर्गत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. तुम्हीही या भरतीसाठी इच्छुक असाल तर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मे 2025 आहे. HAL Nashik Bharti 2025
या भरती मार्फत एकूण ४ जागा भरल्या जाणार आहे. ही भरती सल्लागार या पदासाठी होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना भरघोष पगार मिळेल. उमेदवारांनी भरतीची जाहिरात वाचून अर्ज करावा. HAL Nashik Recruitment 2025
पदाचे नाव – सल्लागार
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे अभियांत्रिकी/तंत्रज्ञान (प्राधान्यतः वैमानिक/यांत्रिक अभियांत्रिकी/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) मध्ये पूर्णवेळ नियमित पदवी असणे आवश्यक आहे. (सविस्तर पात्रतेसाठी कृपया जाहिरात पाहावी)
वयोमर्यादा आणि पगार :
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ६१ वर्षापर्यंत असावे तर या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ९०,०००/- ते २,४०,००० पर्यंतचा पगार मिळेल.
नोकरी ठिकाण – नाशिक
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य व्यवस्थापक (मानव संसाधन), हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, एअरक्राफ्ट डिव्हिजन, नाशिक, ओझर टाउनशिप पोस्ट ऑफिस, तालुका-निफाड, नाशिक- ४२२२०७, महाराष्ट्र.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 मे 2025
अधिकृत वेबसाईट – https://www.hal-india.co.in/