---Advertisement---

Nashik : ठेकेदाराकडून लाखो रुपयांची लाच घेणारा गटविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

lach
---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२५ । भरघोष पगार असूनही सरकारी बाबूंकडून लाच मागितली जात असल्याचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाहीय. यातच नाशिकमधील सुरगाणा पंचायत समितीचा वर्ग १ गटविकास अधिकारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत सुरगाणा गावात केलेल्या कामांचे दोन कोटी ३२ लाख ३० हजारांचे थकीत बिले काढून देण्याकरता ठेकेदाराकडून दोन लाख १० हजारांची लाच घेणारा सुरगाणा पंचायत समितीचा गटविकास अधिकारी महेश गोकुळ पोतदार यास लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. सुरगाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार ठेकेदार आहेत. त्यानी सुरगाण्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत २ कोटी ३२ लाख ३० हजारांचे कामे केले आहे. या कामांचे थकीत बिल काढण्याकरता तक्रारदार यांनी पंचायत समिती कार्यालयात बिल सादर केली होती. बिल काढून देण्याच्या मोबदल्यात गटविकास अधिकारी महेश पोतदारने तक्रारदाराकडे २ लाख १० हजारांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदारांनी एसीबीकडे तक्रार केली.

पथकाने पंचायत समिती कार्यालयात सापळा रचला. गटविकास अधिकारी पोतदार यास तक्रारदाराकडून २ लाख १० हजारांची रक्कम घेतांना पथकाने रंगेहाथ अटक केली. निरीक्षक राजेंद्र सानप, किरण धुळे, विलास निकम, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---