नाशिक लाईव्ह न्यूज । ६ मे २०२५ । सोने चांदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. मागच्या आठवड्यात घसरण झालेल्या सोने चांदी दरात या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठी वाढ झालीय. नाशिक सराफ बाजारात सोमवारी सोने दरात १७५० रुपयाची तर चांदी दारात १००० रुपयांहून अधिकची वाढ झाली. यामुळे सोन्याचा दर पुन्हा उच्चांकीच्या दिशेनं जात आहे.
नाशिकमध्ये सोमवारी सोने दरात वाढ झाली. यामुळे सध्या २४ कॅरेट सोन्याचा दर ९८,३६० रुपये प्रति तोळ्यापर्यंत पोहोचले आहे. दुसरीकडे चांदीचा दर १०५० रुपयांनी वाढू तो ९७,८५० रुपये प्रति किलोवर गेला आहे.
MCXवर सोन्याचा दर काय आहेत?
6 मे 2025 रोजी सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच एमसीएक्सवर सोन्याचा दरात प्रचंड वाढीसह 95,940 रुपये प्रति ग्रॅम नोंदवला गेला, तर मागील बंद 94,649 इतका आहे. चांदीचा दर 1 रुपये प्रति किलोने घसरून 96,900 रुपये प्रति किलो झाला. सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. दागिने खरेदी करणारे ग्राहकांच्या चिंतेत भर झालेली पाहायला मिळत आहे. आज सकाळी 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 98,460 रुपये होता, तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 92,250 रुपये होता. अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉरचा परिणाम तीव्रतेने होत असल्याचे पाहायला मिळत आहे.