नाशिक लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२५ । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर लागू केलेल्या 245 टक्के टॅरीफ दराच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोने तेजीत आले आहे. बुधवारी सोन्यासह चांदी दरात मोठी वाढ झाली. या वाढीनंतर नाशिक सराफ बाजारात सोन्याच्या किमतीने आतापर्यंत उच्चांकी गाठली आहे.
बुधवारी सोने दरात १३५० रुपयाची वाढ झाली. यामुळे २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह 97900 इतक्या विक्रमी उंचीवर जाऊन पोहोचले आहेत.दुसरीकडे चांदीचा एक किलोचा दर पुन्हा एक लाखाच्या घरात पोहचला आहे. बुधवारी चांदी दरात देखील १५५० रुपयाची वाढ होऊन प्रति किलो १००२२० रुपयावर पोहोचली आहे.
अमेरिकेने 2 एप्रिलपासून भारतासह इतरही देशांवर जबर शुल्कवाढ लागू केली होती. भारतासाठी 26 टक्के शुल्कवाढ जाहीर केली तर इतर देशांनाही कमी अधिक प्रमाणात शुल्कवाढ केली आहे. त्यानंतर अमेरिकेने चीन वगळता इतर देशांवरील शुल्कवाढीला 90 दिवसांची स्थगिती दिली. मात्र, किमान 10 टक्के शुल्क कायम ठेवले आहे. याचा मोठा परिणाम जगभरातील बाजारपेठांवर झाल्याचे दिसून आले.