---Advertisement---

सोन्याने ऐतिहासिक उच्चांक गाठला; जाणून घ्या नाशिक सराफ बाजारातील भाव?

gold
---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । सोने आणि चांदीचे दागिने बनविणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका देणारी बातमी आहे. बुधवारी एकाच दिवसात सोने आणि चांदी दरात मोठी वाढ झाली. यामुळे सोन्याच्या किमतीने ऐतिहासिक उच्चांक गाठला. नाशिक सराफ बाजारात सोन्याचा दर जीएसटीसह ८३ हजारांवर गेला आहे. Gold Silver Rate Nashik

दरवाढीचे कारण काय?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच इतर देशांवर आयात शुल्क लादण्याची धमकी दिल्यांनतर गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याकडे आपला मोर्चा वळवला आहे.

नाशिकमध्ये आताचे भाव काय?
नाशिक सराफ बाजारात सध्या २२ कॅरेट सोन्याचा दर ७६,१०० रुपये तर २४ कॅरेट सोने ८३,०५० रुपयांवर पोहोचले आहे. यापूर्वी गेल्या ट्रेडिंग सत्रात २४ कॅरेट सोन्याचा भाव ८२,८४० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाला होता. चांदीचा भाव १,००० रुपयांनी वाढून ९३,००० रुपये प्रति किलो झाला, जो मागील व्यवहाराच्या दिवशी ९२,००० रुपये प्रति किलो होता.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---