---Advertisement---

ग्राहकांनो पळा खरेदीला ; सोन्याच्या दरात ३,५०० रुपयांची घसरण, चांदीही स्वस्त..

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २८ जून २०२५ । जागतिक स्तरावरील घडामोडीमुळे मागच्या काही दिवसात सोन्याचा तोळा पुन्हा लाखावर गेला होता. तर चांदी दराने ऐतिहासिक उसळी घेतली होती. मात्र आता सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली. गेल्या १० दिवसांत सोन्याच्या तोळा सुमारे ३,५०० रुपयांनी घसरला झाली आहे. म्हणून जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल आताचे दर तपासून घ्या..

सध्या सोन्याचा भाव १,०१,००० रूपयांवरून ९८,००० रूपयांवर आला आहे. २८ जून रोजी सोन्याच्या दरात तब्बल ५५० रुपयांची घट झाली असून, सध्या सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर ९७,५०० आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर ८१,३०० पेक्षा अधिक आहे. तर, देशात एक किलो चांदीचा दर १,०७,८०० रूपये प्रति किलो आहे. चांदीच्या दरात घट होत नसल्याचं चित्र आहे.

२८ जून रोजी सोन्याचा दर
शनिवारी २८ जून रोजी सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ८९,३०० रूपये आहे. तर, २४ कॅरेट सोन्याचा दर ९७,५७० रूपये आहे.

चांदीची किंमत
गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या दरातही सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र आहे. मात्र, आज चांदीचा दर घसरला आहे. आज २८ जून रोजी चांदीचा भाव १,०७,८०० रूपये प्रति किलोवर आहे. कालच्या तुलनेत चांदीचा दर १०० रूपयांनी घसरला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---