नाशिक लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२५ । सध्या सोने आणि चांदी दरात चढ उतार सुरु आहे. दरम्यान शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी, सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठा बदल दिसून आला आहे. आज सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. सोन्याचा दर पुन्हा लाखावर गेला तर चांदीने उच्चांकी गाठली असून यामुळे आता सणासुदीचे दिवस जवळ येताना ग्राहकांच्या खिशाला झळ बसेल हे नक्की.
आज सोन्याच्या किमतीत ६०० रूपयांनी वाढ झाली आहे. १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ९९००० रूपये आहे. तर, एक किलो चांदीचा दर १,११,००० रूपये आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी 1 ऑगस्टपासून कॅनेडियन वस्तूंवर 35% कर लावण्याची घोषणा केल्याने पुन्हा एकदा जागतिक व्यापार युद्ध सुरू झाले आहे. अशा परिस्थितीत, व्यापार अनिश्चिततेमुळे सोन्याच्या दरात वाढ झाली.
काय आहे आजचा सोन्या-चांदी दर?
२२ कॅरेट सोनं – प्रति ग्रॅम ९०,७५० रूपये.
२४ कॅरेट सोनं – प्रति १० ग्रॅम ९९,०००
चांदी – १,११,००० रूपये प्रति किलो.