---Advertisement---

ग्राहकांच्या खिशाला पुन्हा कात्री ; आज सोन्याचा तोळा महागला, खरेदीपूर्वी वाचा आताचे भाव?

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ३० मे २०२५ । गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहे. दरम्यान आज तुम्हीही सोने खरेदीचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कालच्या तुलनेत, आज शुक्रवारी सोन्याचा भाव ४०० रुपयांपर्यंत वाढला. यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार आहे.

आज झालेल्या दरवाढीनंतर २४ कॅरेट सोन्याचा भाव ९७,४०० रुपयांवर व्यवहार करत आहे आणि २२ कॅरेट सोन्याचा दर ८९,३०० रुपये आहे. सोन्याचे दर वाढल्यामुळे लग्नसराईसाठी सोनं खरेदी करणाऱ्यांना आता अधिकचे पैसे खर्च करावे लागणार आहेत.

नाशिकमधील भाव?
गुडरिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा २७० रुपयांनी वाढ झाली आहे. एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ९७,३१० रुपये खर्च करावे लागणार आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर ८८,९५० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर दुसरीकडे चांदी दर स्थिर आहे.

दरवाढीचे कारण काय?
सोन्याच्या किमती वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे जागतिक अस्थिरता आणि आर्थिक अनिश्चितता. जेव्हा जगात भू-राजकीय तणाव, युद्ध किंवा मंदीसारख्या परिस्थिती असतात तेव्हा गुंतवणूकदार शेअर बाजार किंवा इतर धोकादायक पर्यायांऐवजी सोन्यात गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित मानतात. याशिवाय, डॉलरची कमकुवतपणा, महागाई दरात वाढ आणि व्याजदरात घट यामुळे देखील सोन्याची किंमत वाढते. या परिस्थितीत गोंधळ वाढत असताना, सोन्याची मागणी देखील वाढते, ज्यामुळे त्याच्या किमती वाढतात.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---