नाशिक लाईव्ह न्यूज । १६ मे २०२५ । या आठवड्यात सलग चार दिवस सोन्याच्या किमतीत घसरण दिसून आली. मात्र आज सोन्याच्या किमतीत १२०० रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अधिकचे पैसे मोजवे लागणार आहे.
मनी कंट्रोलच्या बेवसाईटनुसार, आज म्हणजेच १६ मे रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर ९५,२०० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा दर ८७,२०० रुपये आहे. शुक्रवारी १६ मे २०२५ रोजी देशातील मोठ्या शहरांमध्ये सोने आणि चांदीचा भाव किती आहे ते जाणून घेऊया.
जगभरातील वातावरण थोडं शांत झालं असून अमेरिका आणि चीनमधील व्यापारी तणाव कमी झाल्यानंतर सोन्याच्या किमतीत घसरण झाली. मात्र आज सोन्याचा भाव वाढला आहे. आज शुक्रवारी म्हणजेच १६ मे रोजी २२ कॅरेट सोन्याचा भाव ८७,३५० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ९५,२८० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. याशिवाय मुंबईसारख्या शहरात २२ कॅरेट सोन्याचा भाव ८६,१०० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ही ९५,१३० रुपये प्रति १० ग्रॅम असल्याची माहिती आहे.