---Advertisement---

Gold Rate : सोने दराने इतिहास रचला, नाशिकच्या सराफ बाजारात असे आहेत भाव?

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२५ । अमेरिकन टॅरिफचा थेट परिणाम मौल्यवान धातूंवर दिसून येत असून नाशिकमध्ये सोन्याच्या किमतीने इतिहास रचला आहे. सोन्यात आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच मोठी तेजी दिसून आली. मंगळवारी सोने दरात ८०० रुपयांची वाढ होऊन साेने ९४ हजारांच्या उंबरठ्यावर असून, चांदीही उच्चांकावर आहे.

नाशिक सराफ बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव ८६ हजार ३०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव९३ हजार ८०० रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, मात्र मंगळवारी चांदी दरात १०६० रुपयाची घसरण दिसून आली यामुळे बुधवारी सकाळच्या सत्रात चांदीचा एक किलोचा दर १०१००० रुपये इतका होता.

दरम्यान पुढील महिन्यात लग्नसराईच्या बऱ्याच तारखा असून, यजमान मंडळींकडून सोने-चांदी खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, वाढते दर यजमानांना धक्का देणारे ठरत आहेत. मंगळवारी दराने पुन्हा एकदा उच्चांकी आकडा गाठला आहे. दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, व्यापारीवर्ग देखील धास्तावल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. गुंतवणूकदार मात्र याकडे संधी म्हणून बघत असल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---