---Advertisement---

Gold Price : सोन्याला पुन्हा चकाकी; ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका, खरेदीपूर्वी वाचा आताचे दर?

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २७ मे २०२५ । सोन्याच्या दरात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहे. लग्नसराई असल्यामुळे सोनं खरेदी करण्याकडे नागरिकांचा भर आहे. पण सोन्याचे दर वाढत असल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. दरम्यान एक दिवसाच्या घसरणीनंतर आज सोने दरात पुन्हा वाढ झाली आहे.

सोन्याच्या दरात प्रती तोळा ४९० रुपयांनी वाढ झाली आहे. यापूर्वी सोमवारी सोने दरात ४३० रुपयांनी घट झाली होती. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला होता. पण आज पुन्हा सोन्याचे दर वाढले आहेत

आताचे सोने दर
गुडरिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा ४९० रुपयांनी वाढ झाली आहे. एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ९८,१३० रुपये खर्च करावे लागणार आहे.

तर आज २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा ४५० रुपयांनी वाढ झाली आहे. २२ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी ८९,५०० रुपये मोजावे लागतील. तर १८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा ३७० रुपयांनी वाढ झाली आहे. १८ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी ७३,६०० रुपये खर्च करावे लागतील.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---