---Advertisement---

नाशिकच्या पिंपळगाव मध्ये बांबूच्या गोडाऊनला भीषण

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२५ । नाशिकच्या पिंपळगाव मध्ये बांबूच्या गोडाऊनला भीषण आग लागली लागल्याची घटना शुक्रवार (दि.21) रोजी पावणे बाराच्या सुमारास घडलीय. आगीने इतका रौद्र रूप धारण केले की, आसपासची काही दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आग वीजवण्यासाठी अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पिंपळगाव बसवंत येथील महेश भेळभता दुकाना शेजारील दोन तीन गोडाऊनसह आजूबाजूच्या दुकानांना आग लागल्याची घटना घडली आहे. बांबूच्या गोडाऊनला आग लागल्यानंतर आजूबाजूचे काही दुकानं देखील आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहेत. आग लागण्याचे कारण अस्पष्ट असून आग वीजवण्यासाठी अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये बॅटरीचे दुकान, बांबूचे गोडाऊन आणि भेळभात्याचे गोडाऊन जळून खाक झाले आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---