---Advertisement---

नाशिकमध्ये भररस्त्यात  रिक्षाचालकांनी मुलीला छेडलं; फोटोही काढले अन् मग..

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२५ । एकीकडे राज्यात बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातच नाशिकमध्ये एक संतापजनक घटना घडली. एका शाळकरी मुलीची दोन रिक्षाचालकांनी छेड काढली. भररस्त्यात तिची वाट अडवली. नंतर तिची छेड काढली. दोघांनी तिला त्यांचे कागदावर नंबर लिहून दिला. तसेच कॉल करण्यासही धमकी दिली.

मुलीने त्यांच्या तावडीतून पळ काढला आणि पोलीस ठाणे गाठत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नाशिकमध्ये गुन्हेगारीने डोकं वर काढल्याचं दिसत आहे. यातच ही संतापजनक घटना समोर आलीय. दोन रिक्षाचालकांनी भररस्त्यात मुलीची वाट अडवली आणि तिची छेड काढली

या दोघांनी मोबाईल नंबर दिल्यानंतर आरोपी इतक्यावरच थांबले नाही. त्यांनी मुलीचे स्वत:च्या मोबाईलवर काही फोटोही काढले. पीडित मुलीने त्यांच्या तावडीतून पळ काढला. घर गाठत पालकांना याची माहिती दिली. पीडित मुलीने नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रारही दाखल केली.

पीडित मुलीच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित मुस्तफा शेख आणि अरबाज पठाण या दोघांना अटक केली. तसेच आरोपींविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संशयीतांकडून मोबाईल हस्तगत करण्यात आले असून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या रिक्षाचाही शोध पोलीस घेत आहे. या प्रकरणानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---