---Advertisement---

राऊत, आव्हाड ‘या’ बोलघेवड्यांना.. नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन बरसले

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । १२ मे २०२५ । पहलगाम हल्ल्याचा बदल घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत एअर स्ट्राइक करत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे ९ तळ उडविले. यानंतर दोन्ही देशाचे लष्कर आमने-सामने येत युद्ध परिस्थिती निर्माण झाल्याने सीमांवर तणावाचे वातावरण आहे.सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली असली तरी विरोधकांनी परिस्थिती हातळण्यात केंद्रातील मोदी सरकारची मुत्सद्देगिरी कुजकामी ठरत असल्याची विरोधक टीका करत आहेत.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह विरोधक ही युद्ध परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार कमी पडत असल्याची टीका करत आहेत. या टीकेवर आता भाजप मंत्री गिरीश महाजन प्रत्त्यतर दिल आहे. आपल्याकडेच असे अतिरेकी असल्यावर बाहेरच्यांची गरज काय? राऊत, आव्हाड या बोलघेवड्यांना दुसरा उद्योग दिसत नाही. उठसुठ टिका करतात. युध्द थांबले हे चांगले झाले तरी त्यांना सहन होत नाही, अशा शब्दात महाजन यांनी टीका केली आहे.

काय म्हणाले गिरीश महाजन?
भारतीय सैन्य दल व पंतप्रधान मोदींवर देशाचा पूर्ण विश्‍वास आहे. पण खासदार संजय राऊत आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना काही काम नसल्यामुळे ते विरोध करतात. युध्दजन्य परिस्थितीत पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करतात”. आपल्याकडेच असे अतिरेकी असल्यावर बाहेरच्यांची गरज काय? असा प्रश्‍न मंत्री महाजन यांनी केला.

महात्मा गांधींवरील हल्ला काँग्रेसला दहशतवादी वाटत असेल, तर त्याला आम्ही काहीच करू शकत नाही. पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत दयनिय असून त्यांच्याकडे खायला पैसे नाहीत. त्यांच्याकडे एक नेतृत्व नाही. अंतर्गत वाद असल्यामुळे पाकिस्तानची वाईट अवस्था झाली आहे. भारत प्रगतीपथावर आहे. त्यामुळे युध्द थांबले तर देश हिताचे ठरेल, असेही मंत्री महाजन म्हणाले.

कुंभमेळ्याची तयारी सुरू
नाशिकमध्ये कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. कामं सुरळीत सुरू असल्यानं नाराजी असण्याचा काहीच कारण नाही. मंत्रिमंडळाने त्यासाठी निधी मंजूर केला आहे. कुंभमेळ्याच्या दृष्टीने आवश्‍यक कामे वेळेत पूर्ण होतील. साधू, महंत व नागरिकांना कुठल्याही दुरवस्थेचा सामना करावा लागणार नाही, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---