---Advertisement---

Nashik : मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात ‘घर घर संविधान’ कार्यक्रम

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात गणतंत्र दिवसाच्या अमृतमहोत्सव निमित्ताने ‘घर घर संविधान’ हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर, ॲड. दराडे, कृषीभूषण तुकाराम बोराडे, नामदेव हिरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते, असे वसतिगृहाच्या गृहप्रमुख विजयश्री बाबर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

यावेळी सहाय्यक आयुक्त श्री.नांदगावकर व ॲड. दराडे यांनी मार्गदर्शन केले. घर घर संविधान कार्यक्रमात वसतिगृहाच्या विद्यार्थिंनींनी तिरंगा पदयात्रा काढली. वसतिगृहात सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले यात देशभक्तीपर गीते, एकांकिका, नाटक विद्यार्थिंनींनी सादर केली. वसतिगृहाच्या गृहप्रमुख श्रीमती बाबर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---