नाशिक लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२५ । राज्यातील एकही ठिकाणी गुलेन बॅरी सिंड्रोम (GBS) नावाचा दुर्मिळ आजाराने धुमाकूळ घातला असून आता नाशिक शहरात देखील जीबीएसचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे. शहरात जीबीएस रुग्ण आढळून आल्याने नाशिक जिल्हा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे.
नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील साठ वर्षीय व्यक्तीला जीबीएस आजाराची लागण झाली आहे. त्यांनी याआधी खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेले आहेत. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आता सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नाशिककरांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, बाहेरचे खाणे टाळावे, अशुद्ध पाणी पिणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
‘जीबीएस’ आजार नेमका काय?
गुलेन बॅरी सिंड्रोममध्ये बाहेरील विषाणू किंवा जिवाणूंवर हल्ला करणारी शरीरातील रोगप्रतिकारशक्तीच मज्जासंस्थेवर हल्ला करते. त्यामुळे मेंदूकडून शरीरातील इतर अवयवांना मिळणारे संकेत कमी होतात, असे या आजाराचे स्वरूप आहे. स्नायू कमकुवत होऊ शकतात. हाता-पायातील संवेदना कमी होऊ शकते. गिळताना किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. प्रौढांमध्ये आणि पुरुषांमध्ये ही समस्या अधिक असून, सर्वच वयोगटांतील लोकांना याचा त्रास होऊ शकतो.