---Advertisement---

अर्थसंकल्पापूर्वी सर्वसामान्यांना मोठा दिलासा ; गॅस सिलिंडरच्या किमतीत ‘इतक्या’ रुपयांनी कपात

gas
---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । अर्थसंकल्पापूर्वी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजपासून म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 7 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. कमी झालेल्या किमती फक्त 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरवर लागू असतील, तर घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

गेल्या महिन्यात, सर्वात मोठ्या OMC, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने 6 महिन्यांत प्रथमच 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 14.5 रुपयांनी कमी केली होती आणि ती मेट्रो शहरांमध्ये 16 रुपयांवर आणली होती. नवीन वर्ष 2025 पासून, 19 किलो सिलेंडरच्या एलपीजीच्या किंमती सलग दुसऱ्या महिन्यात घसरत आहेत.

देशाची राजधानी दिल्लीत कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात 7 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. सध्या हे दर 1,797 रुपये आहेत. कोलकातामध्ये सर्वात कमी 4 रुपयांची कपात झाली आहे. तिथे दर आता 1907 रुपये आहेत. मुंबई आणि चेन्नईत कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात 6.5 रुपयाची कपात करण्यात आली आहे. त्यानंतर दोन्ही महानगरात कमर्शियल गॅस सिलेंडरचे दर अनुक्रमे 1749.50 रुपये आणि 1959.50 रुपये झाले आहेत. मागच्या दोन महिन्यात देशाची राजधानी दिल्ली आणि मुंबईत 21 रुपयांनी कमर्शियल गॅस सिलेंडरचे दर घसरले आहेत.

घरगुती गॅस सिलेंडरचा दर काय आहे?
दुसऱ्याबाजूला घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात सलग 11 व्या महिन्यात कोणताही बदल झालेला नाही. मार्च 2024 मध्ये शेवटचा घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात बदल झाला होता.

LPG च्या किमतीतील हा बदल 1 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या बजेट 2025 च्या आधी आला आहे. शनिवारी अर्थमंत्र्यांकडून पेट्रोलियम उत्पादनांवरील शुल्कात बदल अपेक्षित आहेत. अर्थमंत्री एलपीजी किंवा इतर पेट्रोलियम उत्पादनांशी संबंधित कोणत्याही सुधारणांची घोषणा करतात की नाही यावर लक्ष ठेवले जाईल.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---